त्र्यंबकेश्वर: रविवारच्या सुट्टीमुळे येथे भाविकांची अहोरात्र गर्दी आहे. भल्या पहाटेपासूनच ‘बम बम भोले’चा नारा गुंजत असतो. रविवारी (ता.३) पहाटेपासूनच कुशावर्त तीर्थावर स्नानासाठी भाविकांची गर्दी झाली होती. पहाटे तीनला पूर्वदरवाज्याजवळ भाविकांनी रांगा लावल्या होत्या. पहाटे पाचला पूर्व व उत्तर दरवाजा उघडण्यात आल्यावर भाविकांची दर्शनासाठी अहमिका सुरु झाली.