Nashik Kumbh Mela
sakal
नाशिक: अवघ्या पावणेदोन वर्षांवर आलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन कागदोपत्री दिसत असले, तरी प्रभारी अधिकारी, निधीची कमतरता व नेत्यांच्या शह-काटशहमुळे मूर्त स्वरूप मिळत नव्हते. निविदा प्रक्रियेत असलेली कामे एवढीच कामांची प्रगती दिसून येत आहे; परंतु आता कायमस्वरूपी अधिकारी मिळाल्याने कुंभमेळ्याच्या विकासकामांना बळ व वेग मिळेल, अशी अपेक्षा नाशिककरांची आहे. दुसरीकडे आता शह-काटशहाच्या राजकारणात नेत्यांचेही खुंटे बळकट झाल्याने कुंभमेळ्याच्या कामांना अधिक पाठबळ मिळेल, अशी आशा करायला हरकत नाही.