Agriculture
sakal
टाकेदेवगाव: दिवाळी सणानंतर खरीप पिकाची काढणी सुरू असतानाच त्र्यंबकेश्वर तालुक्यात आजमितीस मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाने तुंबळधार लावल्याने तालुक्यातील देवगाव, टाके देवगाव परिसरातील भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पाण्यानी भरलेल्या खाचरातील पिके सडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अचानकपणे विजेच्या कडकडाटासह येणाऱ्या पावसाने भात पिकांची वाट लावली असून बळिराजा हवालदिल झाला आहे.