Trimbakeshwar News : त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण; सुरक्षारक्षकांचा माज कॅमेऱ्यात कैद!

Security Guards Assault Devotee at Trimbakeshwar Temple : श्री त्र्यंबकेश्‍वर मंदिरात सोमवारी (ता. २) सुरक्षारक्षकांनी भाविकाला मारहाण केल्याची घटना घडली. या मारहाणीच्या घटनेची जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दखल घेतली आहे.
 Trimbakeshwar Temple

Trimbakeshwar Temple

sakal 

Updated on

नाशिक: आद्य ज्योतिर्लिंग श्री त्र्यंबकेश्‍वर मंदिरात सोमवारी (ता. २) सुरक्षारक्षकांनी भाविकाला मारहाण केल्याची घटना घडली. या मारहाणीच्या घटनेची जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दखल घेतली आहे. इगतपुरी- त्र्यंबकेश्‍वर प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली या सर्व प्रकारची चौकशी करण्यात येईल. चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com