त्र्यंबकेश्वर: दर्शनासाठी होणारी गर्दी आणि त्यामुळे होणारी भाविकांची गैरसोय हा येथील नेहमीचाच प्रश्न, मात्र यावर कायमस्वरूपी मनापासून तोडगा काढायला कुणीही तयार नाही. परराज्यातून येणारे भाविक आणि त्यांची होणारी अवहेलना थांबायला तयार नाही. शनिवारी येथे झालेल्या लाठीमाराचा प्रकार हा गर्दीत थांबलेल्या भाविकांच्या संयमाची कसोटी पाहणारा होता. अचानक कुणाच्यातरी डोक्यातून मुखदर्शनाची कल्पना येते अन् त्यातून अनर्थ घडत सुरक्षारक्षकांकडून थेट मारहाणीची घटना घडणे यामुळे देवस्थानच्या प्रतिमेला बसणारा धक्का घातक ठरू शकेल, अशी चर्चा येथील भाविकांत दिसून आली.