त्र्यंबकेश्वर: नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराची सध्या अत्यंत दुरवस्था झाली असून, मंदिराच्या चारही बाजूंनी आणि सर्वच भागांतून पाण्याची गळती सुरू आहे. पेशव्यांनी १७५५ ते १७८६ या काळात उभारलेल्या, म्हणजेच सुमारे २४० वर्षांपूर्वींच्या या भव्य आणि सुबक मंदिराच्या स्तंभावर आणि दगडी भिंतींवर मोठ्या प्रमाणावर गळती लागली आहे.