त्र्यंबकेश्‍वर मंदिर परिसरातील रस्ते दुरुस्तीला मंजूरी

त्र्यंबकेश्‍वर मंदिर परिसरातील रस्ते दुरुस्तीला मंजूरी
Published on: 
त्र्यंबकेश्‍वर मंदिर परिसरातील रस्ते दुरुस्तीला मंजुरी प्रतीक्षा कक्ष, आच्छादित मार्ग आणि विधी भवन नूतनीकरणाच्या प्रस्तावांवर चर्चा सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.२२ : त्र्यंबकेश्वर येथील मंदिर परिसरातील रस्ता दुरुस्तीच्या कामाला राष्ट्रीय संस्मारक प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. यामुळे सुलभ वाहतूक, सुरक्षितता आणि मंदिर परिसरातील सुविधांच्या सुधारणेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर व परिसरातील पायाभूत सुविधांच्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी गुरुवार (ता.२२) रोजी राष्ट्रीय संस्मारक प्राधिकरणाच्या माध्यमातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. बैठकीस नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. रस्ता दुरुस्ती, अत्याधुनिक प्रतीक्षा कक्ष व शौचालय सुविधा, आच्छादित मार्ग तसेच विधि भवन इमारतीची दुरुस्ती व नूतनीकरण या कामांचा समावेश आहे. सविस्तर चर्चेनंतर मंदिर परिसरातील रस्ता दुरुस्तीच्या कामाला तत्काळ मंजुरी देण्यात आली. त्यामुळे या कामाच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला असून, नियोजित कामांमधून रस्त्यांची आवश्यक दुरुस्ती, रुंदीकरण व सुशोभीकरण करण्याच्या दृष्टीने पुढील कार्यवाही करता येणार आहे. यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांची वाहतूक अधिक सुलभ करण्यास मदत होईल. तीन प्रस्तावावर सकारात्मक चर्चा मंदिर परिसरातील भाविकांसाठी अत्याधुनिक प्रतीक्षा कक्ष व शौचालय सुविधा उपलब्ध करणे, आच्छादित मार्ग विकसित करणे तसेच विधि भवन इमारतीची दुरुस्ती व नूतनीकरण करणे या उर्वरित तीन प्रस्तावांवरही बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. या कामांसाठी आवश्यक तांत्रिक दस्तऐवज सादर केल्यानंतर पुढील अंतिम मंजुरी देण्यात येईल, असे राष्ट्रीय संस्मारक प्राधिकरणाकडून स्पष्ट करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com