Crime
sakal
नाशिक: त्र्यंबकेश्वर येथे नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्याच्या कडेला आढळलेल्या भंगार गोळा करणाऱ्या महिलेच्या निर्घृण खुनाचा उलगडा करण्यात त्र्यंबक पोलिसांना यश आले आहे. दारूच्या नशेत जवळीक करण्याचा प्रयत्न महिलेनं ठामपणे नाकारल्याने संशयिताने तिच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयितास अटक केली आहे.