दोनशे फूट खोल दरीत कोसळला ट्रक; कसारा घाटातील थरार!

kasara truck accident.jpg
kasara truck accident.jpg

इगतपुरी (नाशिक) : सर्वत्र दिवाळी पाडव्याची धामधूम सुरु असतानाच मुंबई नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात एक थरारक अपघात झाला.

रस्त्यालगतचे संरक्षक भिंती तोडून ट्रक दरीत

(ता.16) रात्री 8 वाजेच्या सुमारास मुंबईहुन नाशिककडे जाणारा ट्रक क्रमांक (एम एच 15 इ जी 5922) हा भरधाव वेगात घाट चढत असताना एका वळणावर चालकाचे गाडी वरील नियंत्रण सुटले व ट्रक थेट 200 ते 250 फूट खोल दरीत कोसळला. रस्त्यालगतचे संरक्षक भिंती तोडून ट्रक दरीत कोसळुन त्या ट्रकमध्ये असलेले अन्य दोन जण व चालक असे एकूण 3 जण गाडीसह दरीत गेले. या अपघाताची माहिती महामार्ग पोलीस घोटी टॅप यांना मिळताच त्यांनी कसारा पोलिसांना संपर्क करून माहिती दिली. दरीत पडलेल्या ट्रक मधील लोकांना वाचवण्यासाठी मोठे मदत कार्य लागणार असल्याने पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन टीम या व्हाट्सअप ग्रुपच्या सदस्यांना फोन करून कळवले. अपघाताची माहिती मिळताच ग्रुपचे ऍडमिन शाम धुमाळ, मनोज मोरे, दत्ता वाताडे, अक्षय राठोड, महेंद्र माने, विनोद आयरे, प्रसाद दोरे, लक्ष्मण वाघ, बाळू मागे, स्वप्नील कलंत्री, निनाद तावडे घटनास्थळी दाखल झाले व मदत कार्य सुरु केले. 

इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात रवाना
कसारा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक माळी, पोलीस कर्मचारी उमेश चौधरी, महामार्ग पोलीस घोटी टॅपचे पीएसआय सागर डगळे यांना सोबत घेऊन दरीत उतरल्यावर गाडीत अडकलेला गाडी चालक भाऊसाहेब भदादे,(रा. पिपंळगाव), राहुल कुलकर्णी (रा. नाशिक), भागवत पाठक,(रा. नेरुळ) नवी मुंबई यांना बाहेर काढले व या 3 जणांना जखमी अवस्थेत सुखरूप दरीतुन वर आणले व रुग्णवाहिकेतून तात्काळ इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात रवाना केले. त्या पैकी राहुल कुलकर्णी यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नाशिक येथे हलवण्यात आले. परंतु त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. तर अन्य दोन जण जखमी वर उपचार सुरु आहेत.या प्रकरणी पुढील तपास कसारा पोलीस करीत आहेत.

हेही वाचा > मामाने वाचवले पण नियतीने हिरावले! चिमुकल्या जयाची मृत्युशी झुंज अपयशी

आपत्ती व्यवस्थापन टीमचे सदस्य जखमी.
दरम्यान जीवाची परवा न करता टीम चे तब्बल 14/15 जण पोलिसांना घेऊन दरीत उतरले व दरीत पडलेल्या जखमींना वर आणते वेळी टीमचे 3 सदस्य दरडीचा मार लागून जखमी झाले.

हेही वाचा > मोकाट कुत्र्याच्या तावडीत इवलेसे बिथरलेले पाडस; युवकांनी दिले जीवदान

कसारा घाटातील संरक्षक कठडे निकृष्ट.
दरम्यान घाटातील दरीच्या बाजूने असलेले संरक्षक कठडे पूर्णतः निकृष्ट असल्यामुळे ट्रक थेट खाली दरीत गेला. जर संरक्षक कठडे तयार करते वेळी स्टीलचा वापर करून चांगल्या दर्जाचे कठडे असते तर ट्रक खोल दरीत गेला नसता.- शाम धुमाळ, आपत्ती व्यवस्थापन ग्रुपचे ऍडमिन, कसारा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com