पिकपला आयशरने धडक दिल्याने येवल्याजवळ एकाचा मृत्यू,दोन जण व दोन बैल गंभीर जखमी

पिकपला आयशरने धडक दिल्याने येवल्याजवळ एकाचा मृत्यू,दोन जण व दोन बैल गंभीर जखमी
Published on: 
YEO26B27317 धानोरे : अपघातात नुकसानग्रस्त झालेला आयशर ट्रक ----------------- ३६-२ ट्रकने धडक दिल्याने येवल्याजवळ एक ठार दोन जण व दोन बैल गंभीर जखमी ------------- ​सकाळ वृत्तसेवा येवला, ता. २५ : नगर- मनमाड महामार्गावर धानोरे शिवारात रविवारी (ता.२५) सकाळी ट्रकने पुढे चाललेल्या पिकअपला मागून जोरदार धडक दिल्याने ट्रकचा चालकाचा जागीच मृत्यू झाला. पिकअपमधील दोन जण आणि पिकअपमध्ये असलेले दोन बैलसुद्धा गंभीर दुखापत झाल्याने गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात ट्रकचा चालक साजिद शौकत (ता. मेरठ, उत्तर प्रदेश) हा जागेवर ठार झाला आहे तर कन्हैया पवार व इतर जखमी झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले. ​या धडकेत ट्रकचा पुढील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला. अपघातानंतर ट्रकमध्ये अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाला जेसीबीची मदत घ्यावी लागली. या दुर्घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प होऊन मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने क्रेन व जेसीबीच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने बाजूला करत वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. पशुवैद्यकीय डॉक्टरांनी तातडीने या ठिकाणी येऊन जखमी बैलावर उपचार केले. दरम्यान सततच्या अपघातांमुळे नगर- मनमाड महामार्गावरील सुरक्षिततेचा आणि वेगाच्या नियंत्रणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com