वणी- शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर बेशिस्त वाहने उभी करून वाहतुकीला मोठा धोका निर्माण झाला आहे. शहरातील वाहतूक नेहमीचीच डोकेदुखी बनली. याबाबत ग्रामपंचायत व पोलिस कोणत्याही प्रकारची दखल घेत नसल्याने बेशिस्त वाहतूक वाढत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.