नाशिक: बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे तिसऱ्या श्रावणी सोमवारी ब्रह्मगिरी फेरीसाठी ‘बम, बम भोले’च्या गजरात भाविक रवाना झाले. लाखोंच्या संख्येने सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. खासगी वाहनांना खंबाळे फाट्यापर्यंतच जाता येणार आहे. तर नाशिकमधून राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या फेऱ्या भाविकांसाठी ठेवल्या आहेत. दरम्यान, तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त गोदाघाटावरील कपालेश्वर मंदिरातही सोमवारी (ता. ११) भाविकांची गर्दी होणार आहे. त्यासाठी परिसरातील मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.