Success Story : तुषार देवरे ठरला गावातील पहिला अधिकारी; जिद्दीच्या बळावर ‘STI’ पदाला गवसणी

Deore family and well-wishers expressing happiness after Tushar Deore from Regaon was selected for the post of sales tax inspector in the Public Service Commission examination.
Deore family and well-wishers expressing happiness after Tushar Deore from Regaon was selected for the post of sales tax inspector in the Public Service Commission examination.esakal

मालेगाव शहर (जि. नाशिक) : मनाचा ठाम निश्‍चय असला की कुठल्याही परिस्थितीत यश मिळते. युग स्पर्धेचे आहे. अभ्यासाचे सातत्य व चिकाटीने दरेगाव (ता. मालेगाव) येथील तुषार देवरे याने लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत भरारी घेत ‘विक्रीकर निरीक्षक’ पदाला गवसणी घातली. यानिमित्त दरेगावचा नावलौकिक वाढवत पहिला अधिकारी होण्याचा मान मिळवल्याने तालुक्यात त्याचे कौतुक होत आहे. (Tushar Deore became first officer of devargaon village term becoming STI nashik news)

तुषार येथील प्राथमिक शिक्षक रमेश देवरे व तनिष्का सदस्या पौर्णिमा देवरे यांचा सुपुत्र आहे. वडीलांच्या बदलीमुळे सुरगाणा येथे जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण घेऊन माध्यमिक शिक्षण बोरगावच्या धैर्यशीलराव पवार विद्यालय व नाशिकच्या सीडीओ मेरी हायस्कूलमध्ये झाले. दहावीनंतर सामनगाव येथे अभियांत्रिकी पदवीका पूर्ण करुन संगमनेरला पदवीचे शिक्षण घेतले. पदवीच्या शेवटच्या वर्षात असतानाच नेव्हीत निवड होऊन नौदल अधिकारी पदाने हुलकावणी दिली.

याच दरम्यान टीसीएस, ॲमेझान कंपनी जॉईन केली. हैदराबाद येथे संबंधित प्रशिक्षण घेतले. पहिलाच प्रोजेक्ट उत्कृष्ट ठरल्याने टाटाच्या माध्यमातून शिर्डी संस्थानात सेवा करण्याची संधी मिळाली. या वेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सहवास प्रेरक ठरला. येथूनच कलाटणी मिळाल्याने तुषारने स्पर्धा परिक्षेतून अधिकारी होण्याचा निर्धार केला. वर्षभराचा अनुभव घेऊन राजीनामा देत लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी सुरू ठेवली.

हेही वाचा : काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली??

Deore family and well-wishers expressing happiness after Tushar Deore from Regaon was selected for the post of sales tax inspector in the Public Service Commission examination.
Nashik News : तालुकानिहाय 100 बड्या थकबाकीदारांची नावे जाहीर

पहिल्याच प्रयत्नात पोलिस उपनिरीक्षक राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० उत्तीर्ण केली. मुख्य परिक्षेची जोरदार तयारी केली. मात्र, कोरोनाचे संकट आडवे आले. तीनदा परिक्षा पुढे ढकलली. जिद्दीने तयारी करत पोलिस उपनिरीक्षक व विक्रीकर निरीक्षक पदासाठी २०२१ मध्ये उत्तीर्ण झाला. दरम्यान, गट क मंत्रालय लिपीक, कर सहाय्यक, वन विभाग, रेल्वेत लोको पायलट व कनिष्ठ अभियंता पूर्वपरिक्षा उत्तीर्ण झाला.

मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम वेगवेगळा असल्याने विशिष्ट परीक्षांवर लक्ष केंद्रित केले. अखेर विक्रीकर निरीक्षक पदावर निवड झाली. एवढ्यावरच न थांबता पोलिस उपनिरीक्षक पदाची जानेवारीत मुलाखत असल्याचे तुषारने ‘सकाळ’ला सांगितले. या प्रवासात मालेगावच्या बाविस्कर वाचनालयातील अभ्यास, कोरोनात घरी तर मुख्य परीक्षेसाठी नाशिकच्या नवरंग वाचनालयाचा आधार मिळाला.

"माझ्या या वाटचालीत आई- वडील व मित्रांना श्रेय देतो. या सगळ्या तयारीत त्यांचे पाठबळ महत्वपूर्ण आहे. अपयशाने खचून न जाता अभ्यासातील सातत्यामुळे कुठल्याही परिक्षेचा ताण वाटला नाही." - तुषार देवरे, विक्रीकर निरीक्षक

"मुलाचा कल व आवडीनिवडीला प्राधान्य दिले. त्याच्या स्वतः निर्णय क्षमतेने वेगवेगळ्या परिक्षा दिल्या. आलेल्या संधीकडे अनुभव म्हणून बघितले. आज सर्वत्र कौतुक होत असताना समाधान वाटते." - रमेश देवरे, वडील, प्राथमिक शिक्षक

Deore family and well-wishers expressing happiness after Tushar Deore from Regaon was selected for the post of sales tax inspector in the Public Service Commission examination.
Motivational Story : रत्नाताईंची एसटी बस पोहोचली महाराष्ट्रात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com