साडेबारा हजार विद्यार्थी देणार ‘NEET’; जिल्ह्यात 20 केंद्रांवर परीक्षा

NEET Exam Latest Marathi news
NEET Exam Latest Marathi newsesakal

नाशिक : वैद्यकीय शाखेच्‍या पदवी (Bachelor) अभ्यासक्रमांच्‍या प्रथम वर्ष प्रवेशासाठी नॅशनल इलिजिब्‍लीटी कम एन्ट्रन्स टेस्‍ट (NEET) २०२२ परीक्षा घेतली जाणार आहे. रविवारी (ता.१७) दुपारी दोनला ही परीक्षा घेतली जाणार आहे.

परीक्षेचे प्रवेशपत्र मंगळवारी (ता.१२) उपलब्‍ध करून दिले आहे. जिल्‍हाभरातील वीस परीक्षा केंद्रांवर ऑफलाइन पद्धतीने ही परीक्षा होणार असून, सुमारे साडेबारा हजार विद्यार्थी या परीक्षेला सामोरे जाणार आहेत. (twelve half thousand students give NEET Examination at 20 centers in district on Sunday nashik Exam update news)

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्‍या प्रवेशासाठी नीट-२०२२ (युजी) ही परीक्षा घेतली जाते आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्‍सी (एनटीए) यांच्‍यातर्फे परीक्षेचे संयोजन केले जाते आहे. पेन व पेपरवर आधारित ऑफलाइन पद्धतीने ही परीक्षा होणार आहे.

रविवारी (ता.१७) दुपारी दोन ते सायंकाळी पाच वाजून २० मिनीटे असा तीन तास २० मिनीटे इतका या परीक्षेसाठी अवधी असणार आहे.

या परीक्षेच्‍या कामगिरीच्‍या आधारे एमबीबीएस, बीडीएस यांसह बीएएमएस, बीएचएमएस, बीयुएमएस, फिजिओथेरपी, बी.एस्सी (नर्सिंग) या शिक्षणक्रमांना प्रवेश दिला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रवेशासाठी कठोर स्‍पर्धा लक्षात घेता विद्यार्थ्यांकडून कसून अभ्यास सध्या सुरु आहे.

NEET Exam Latest Marathi news
नाशिक : शहर पोलिस आयुक्तालय हद्दीत मनाई आदेश लागू

यापूर्वीच परीक्षेच्‍या शहराविषयीचा तपशील जारी केला होता. त्‍यापाठोपाठ आता एनटीएतर्फे मंगळवारी परीक्षेसाठी आवश्‍यक असलेले प्रवेशपत्र (हॉलतिकीट) ऑनलाइन पद्धतीने उपलब्‍ध करून दिलेले आहेत.

विद्यार्थ्यांना आपली वैयक्‍तिक माहिती दाखल करून हे प्रवेशपत्र प्राप्त करून घेता येणार आहेत. जिल्ह्यातील २० परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होत असून, सुमारे साडेबारा हजार विद्यार्थी या परीक्षेस प्रविष्ट झालेले आहेत.

NEET Exam Latest Marathi news
Nashik : महापालिकेच्या तिजोरीत 44 कोटींचा अतिरिक्त महसूल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com