esakal | थरारक! २५ प्रवाश्यांसमोर उभा राहिला काळ; मुंबई-आग्रा महामार्गावर दुर्दैवी घटना
sakal

बोलून बातमी शोधा

bus accident gonde.jpg

महामार्गावर सकाळी साडेनऊच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. अचानक बसमधील २० ते २५ प्रवाश्यांवर काळाची झडप आली. अंगावर काटा आणणाऱ्या या घटनेने प्रवाश्यांच्या नातेवाईंकामध्ये खळबळ माजली आहे.

थरारक! २५ प्रवाश्यांसमोर उभा राहिला काळ; मुंबई-आग्रा महामार्गावर दुर्दैवी घटना

sakal_logo
By
काळू राजोळे

वाडीवऱ्हे (नाशिक) : महामार्गावर सकाळी साडेनऊच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. अचानक बसमधील २० ते २५ प्रवाश्यांवर काळाची झडप आली. अंगावर काटा आणणाऱ्या या घटनेने प्रवाश्यांच्या नातेवाईंकामध्ये खळबळ माजली आहे. काय घडले नेमके?

घटनेने प्रवाश्यांच्या नातेवाईंकामध्ये खळबळ

वेळ सकाळची साडेनऊ वाजताची.. मुंबई-आग्रा महामार्गावर कळवणहून मुंबईकडे जाणाऱ्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस (एमएच १४, बीटी ३८०२) गोंदे दुमाला फाट्याजवळ आली असता बसला ओव्हरटेक करून पुढे जात असलेल्या वाहनाशी बसचा अपघात झाला. हा अपघात एवढा जोरदार होता, की त्यात बसमधील २० ते २५ प्रवाशांना डोक्यास तोंडास व मुकामार लागल्याने जखमी झाले. त्यांना जगद्‌गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेतून चालक निवृत्ती गुंड व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळावून नाशिकला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. महामार्गावर सकाळी साडेनऊच्या सुमारास हा अपघात घडला.

हेही वाचा > मामाने वाचवले पण नियतीने हिरावले! चिमुकल्या जयाची मृत्युशी झुंज अपयशी

सुमारे २५ जण जखमी
मुंबई-आग्रा महामार्गावर कळवणहून मुंबईकडे जाणाऱ्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसला अपघात होऊन सुमारे २५ जण जखमी झाले. गोंदे फाट्याजवळ पुढे जात वाहनाशी धडक झाल्याने बसमधील प्रवासी जखमी झाले. अपघातात जखमी झालेले प्रवासी अरुण बाळू जाधव (वय ४६), संगीता अरुण जाधव (३८), शुभम अरुण जाधव (१९, रा. ठाणे), बबन शंकर गायकवाड (६५, रा. राजीवनगर), वसंता दिलीप भोकरे (६०), नीलेश महाबली भंडारी (४४), अनिता महाबली भंडारी (७०, रा. उपनगर), अनिता आरेकर (५६), उमेश लक्ष्मण खाडे (५२, रा. कळवा, ठाणे), दिलीप बाबूराव डावखरे (५६, रा. राजनंदन, चौक नाशिक, पंचवटी), दिलीप मनोहर वानखडे (५०, रा. यवतमाळ) आदींचा समावेश होता. इतर प्रवाशांना किरकोळ उपचार करून सोडून देण्‍यात आले. 

हेही वाचा > मोकाट कुत्र्याच्या तावडीत इवलेसे बिथरलेले पाडस; युवकांनी दिले जीवदान

loading image