SSC Result : योगायोग की चमत्कार? जुळ्या बहिणींना मार्क देखील सेम टू सेम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kajal & Komal Adhav twin Sisters

SSC Result : योगायोग की चमत्कार? जुळ्या बहिणींना मार्क देखील सेम टू सेम

महालपाटणे (जि. नाशिक) : सिनेमामध्ये बऱ्याच वेळा दोघा जुळ्या भाऊ- बहिणींबद्दल आपण बघितले असेल, एकाला भूक लागली की दुसरा भाऊ रडतो किंवा पहिला जर संकटात असेल तर दुसऱ्याला त्याची जाणीव होते. परंतु देवपूरपाडे (ता.देवळा) येथील दहावीच्या परीक्षेत (SSC exam Result) दोघा जुळ्या बहिणींना (Twin Sisters) सारखेच गुण मिळाल्याने परिसरात हा कुतूहलाचा विषय बनला आहे. (twin sisters are first in school with 90.20 percent marks in SSC result Nashik News)

देवपूरपाडे येथील ज्ञानेश्वर माऊली माध्यमिक विद्यालयातील कोमल आढाव व काजल आढाव या दोन्ही बहिणी इयत्ता दहावीत शिकत होत्या. काल दहावीचा (SSC Online result) ऑनलाईन निकाल लागला. त्यात कोमल आणि काजल या दोन्ही बहिणींना सारखेच गुण मिळाल्याने दोघींचे गाव व परिसरात कौतुक होत आहे येथील मन्साराम दादाजी आढाव यांच्या या दोन्ही मुली लहानपणापासूनच अतिशय हुशार व कुशाग्र बुद्धीच्या असल्याने दहावीच्या परीक्षेतही त्यांना ९०.२०% गुण मिळवून त्या विद्यालयात प्रथम आल्या आहेत. संस्थेचे अध्यक्ष अभिमन आहिरे मुख्याध्यापक जे. यु. वाघ , ग्रामपंचायत सदस्य अजय आहिरे, केदा नाना आहेर फाऊंडेशनचे अध्यक्ष ज्ञानेश्वर आढाव व शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. आपल्या मुलींच्या या यशाबद्दल आई जयश्री आढाव वडील मन्साराम आढाव यांनी समाधान व्यक्त केले.विद्यालयाचा निकालही शंभर टक्के लागला असून सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत त्याबद्दल पालकांनी विद्यालयातील शिक्षक, मुख्याध्यापक व अध्यक्ष यांना धन्यवाद दिले.

हेही वाचा: सामोपचार कर्ज परतफेड योजना जून अखेरपर्यंत

विद्यालयातील प्रथम पाच क्रमांकाचे उत्तीर्ण विद्यार्थी:-
१) काजल आढाव-९०.२०
१)कोमल आढाव-९०.२०
२)कावेरी बागुल-८८.२०
३)भूषण आहिरे-८७.६०
३)राज ठाकरे-८७.६०
४)सोनाली आहिरे-८७.२०
५)यश सोनवणे- ८४.८०
५) अंकिता सूर्यवंशी-८४.८०

हेही वाचा: शेतकऱ्यांनो फसवे संकेतस्थळ, भ्रमणध्वनीपासून सावध रहा

Web Title: Twin Sisters Are First In School With 9020 Percent Marks In Ssc Result Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top