तब्बल 2500 कोंबड्यांवर काळाचा घाला; घटनेने शेतकरी हतबल

poultry shed
poultry shedSakal

खेडभैरव (जि. नाशिक) : शेतात राबत असताना शेतकऱ्यांवर वेगवेगळी संकटं कोसळत असतात खेड (ता. इगतपुरी) येथील शेतकरी व पोल्ट्री व्यावसायिक चंद्रकांत किसन वाजे यांच्यावर देखील असेच संकट कोसळले. त्यांचे १०० बाय ३०चे पोल्ट्री शेड सोमवारी (ता. २१) रात्री दोन वाजेच्या सुमारास पोल्ट्रीतील तब्बल अडीच हजार कोंबड्यांवर काळाने घाला घातला. (Two and a half thousand hens die due to collapse of poultry shed)


शेतकरी चंद्रकांत वाजे यांनी दोन ते अडीच वर्षांपूर्वी शेतीला जोडधंदा म्हणून त्यांच्या मळ्यात १०० बाय ३० चे पोल्ट्री शेड बांधले होते. त्यामध्ये तीन हजार ब्रॉयलर कोंबड्या होत्या. या कोंबड्या दोन ते तीन दिवसात त्या बाजारात विकण्यासाठी पाठवणार होते. मात्र रात्री झालेल्या जोरदार वादळी वाऱ्याने भिंती व शेडचे लोखंडी अँगल, पत्रे कोंबड्यावर कोसळल्याने दोन हजार पाचशे कोंबड्या दबून जागेवर मृत्यूमुखी पडल्या आहेत. यात शेतकरी वाजे यांचे लाखोंचे नुकसान झाल्याने ते हतबल झाले आहेत.


पोल्ट्री शेड जमीनदोस्त झाल्याने यातील पक्ष्यांना खाद्य देण्यात येणारे साहित्य, पाईपलाइन, लोखंडी जाळी, पक्षी खाद्य, ताडपत्री इत्यादी साहित्याचे पूर्णतः नुकसान झाल्याने एकूण शेडसह जवळपास १२ ते १३ लाखांचे नुकसान झाल्याचे शेतकरी चंद्रकांत वाजे यांचे म्हणणे आहे. बाळू कचरे, पोलीस पाटील अंकुश वाजे , सखाराम वाजे, संदीप मालुंजकर, व्यंकटेश्वरा हॅचेरी कंपनीचे स्वप्नील मोरे, हेमराज भामरे आदी ग्रामस्थांकडून शासनाने दखल घेऊन पाहणी करत पोल्ट्री व्यावसायिकाला मदत करावी अशी मागणी होत आहे.

poultry shed
नाशिक : खासदार संभाजीराजेंच्या उपस्थितीत मूक आंदोलन



मी अडीच वर्षांपूर्वी शेतीला जोडधंदा म्हणून पोल्ट्री शेडचे बांधकाम केले होते. सोमवारी (ता.२१) रात्री दोनच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसामुळे माझे संपूर्ण पोल्ट्री शेड जमिनोदस्त झाले आहे. माझे एकूण जवळपास १२ ते १३ लाखांचे नुकसान झाले असून शासनाकडून भरपाई मिळावी.
- चंद्रकांत वाजे, पोल्ट्री व्यावसायिक, खेड
(
Two and a half thousand hens die due to collapse of poultry shed)

poultry shed
ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com