Nashik Crime: वाहन तोडफोड प्रकरणी दोघांना अटक; एक तडीपारही गजाआड

arrested
arrestedesakal
Updated on

Nashik Crime : नाशिक रोडच्या धोंगडे मळ्यात वाहनाच्या तोडफोड प्रकरणी आणखी दोघांना शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने अटक केली. याच पथकाने एकाला तडीपार गुंडालाही गजाआड केले. (Two arrested in vehicle vandalism case Tadipar jailed Nashik Crime)

अमन सूरज वर्मा (वय १८, रा. वंदेमातरम्‌ अपार्टमेंट, औटे मळा, जय भवानी रोड, नाशिक रोड), सुधांशू उर्फ सोनू राजेश बेद (१८, रा. रामजी बिल्डिंग, फर्नांडिस वाडी, जयभवानी रोड, नाशिक रोड) असे अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

सोमवारी (ता. २४) पहाटे धोंगडे मळ्यात वाहनांच्या काचा टोळक्याने तलवार, कोयत्याने फोडल्या होत्या. संशयित वर्मा व बेद हे मुंबईला पलायन करणार असल्याची खबर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाला मिळाली असता, पथकाने पाथर्डी फाटा येथे सापळा रचून दोघांना अटक केली.

दोघांना तपासासाठी उपनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. संबंधित कामगिरी युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ, सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर, साबरे, प्रवीण वाघमारे, विशाल काठे, प्रशांत मरकड, महेश साळुंखे, मुक्तार शेख, जगेश्वर बोरसे, अमोल कोष्टी यांनी बजावली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

arrested
Jalgaon Crime News : काम सोडून गेलेल्या कामगारानेच फोडले गुदाम; सव्वालाखांचा माल लंपास

तडीपार गुंडाला अटक

भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार नईम अब्बास शेख (३४, रा. भोई गल्ली, बागवानपुरा, भद्रकाली. हल्ली रा. स्प्रिंग व्हॅली, तपोवन रोड, नाशिक) यास शहर-जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेले होते.

परंतु तो उपनगर हद्दीमध्ये असल्याची खबर मिळताच शहर गुन्हे युनिट एकच्या पथकाने अटक केली. त्यास भद्रकाली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

arrested
Jalgaon Crime News : बॅरेकमधील कैद्यावर सामूहिक अत्याचार; नकार दिल्याने गळा कापण्याचा प्रयत्न

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com