नाशिक- शहरात किरकोळ कारणांवरून मारहाणीच्या घटना घडत आहेत. म्हसरूळ येथे हॉटेलमध्ये टोळक्याने दोघांना बेदम मारले, तर उपनगर येथील रेजिमेंटल प्लाझा येथे उसनवारीतून तिघांनी एकाला मारहाण केली. नाशिक रोडच्या कौटुंबिक न्यायालयाच्या आवारात संशयितांनी मारहाण केली. या प्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल केले आहेत.