
साहित्य संमेलनासाठी पुण्यातून आलेले दोघेजण कोरोना पॉझिटिव्ह
नाशिक : येथे होत असलेल्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात (Marathi Sahitya Sammelan सहभागी होण्यासाठी आलेल्या पुणे येथील दोघांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले आहे. आरोग्य यंत्रणेने संबंधितांना स्थानिक महापालिका रुग्णालयात उपचार घेण्याचा किंवा स्वतःच्या वाहनाने स्वगृही परतण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला होता. दोघे पुन्हा पुण्याकडे रवाना झाले असून सध्या ते संगमनेरपर्यंत पोहोचले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
आडगाव येथील भुजबल नॉलेज सिटी येथे 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे संमेलनाचा आज तिसऱ्या दिवशी समारोप होत आहे. अशात दुपारी साडेबारा ते एक च्या दरम्यान पुणे येथून दोघे कलाप्रेमी संमेलनात सहभागी होण्यासाठी दाखल झाले होते. आरोग्य यंत्रणेला संशय आल्याने या दोघांची रॅपिड अँटिजेंन टेस्ट करण्यात आली. त्यात त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आरोग्य यंत्रणेने नाशिक येथील बिटको हॉस्पिटल येथे दाखल होत उपचार घेण्याचा पर्याय संबंधितांना दिला. परंतु त्यांनी स्वगृही परतण्याचा पर्याय निवडला. आढळून आलेले दोन्ही पॉझिटिव्ह पुरुष असून पिंप्री चिंचवड येथील 42 वर्षीय तर आळंदी येथील बावीस वर्षीय रुग्णाचा यात समावेश आहे.
हेही वाचा: साहित्य संमेलनाला गालबोट, लेखक गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक
कुठलीही लक्षणे नाहीत
विशेष म्हणजे या दोन्ही रुग्णांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण केले होते. यापैकी एकाचे एक डोस तर दुसऱ्याचे दोन्ही डोस झालेले होते. दोघांमध्ये कुठलीही लक्षणे आढळून आलेली नाहीत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. आरोग्य यंत्रणा संबंधितांच्या संपर्कात असल्याचेही सांगण्यात आले.
हेही वाचा: गिरीश कुबेरांवर शाईफेक; काय आहे संभाजी महाराजांवरील पुस्तकाचा वाद?
Web Title: Two From Pune Have Tested Positive For Corona Antigen Test In Marathi Sahitya Sammelan
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..