esakal | मुंबई-आग्रा महामार्गावर अपघात, दोन ठार, एक जखमी | Nashik News
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

मुंबई-आग्रा महामार्गावर अपघात, दोन ठार, एक जखमी

sakal_logo
By
प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : मुंबई-आग्रा महामार्गावरील लोणवाडे शिवारातील आराम हॉटेल समोर कंटेनरने (आरजे-०६ जीबी ७२३२) अपाचे दुचाकीला जबर धडक दिल्याने दोन जण जागीच ठार तर एक जण जखमी झाला. आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात इरफान शेख राजू (वय १९) व सैय्यद जाहेद शहजाद अली (वय १३, दोघे रा. मालेगाव) हे दोघे युवक ठार झाले. अन्य एक जण जखमी झाला.

दुचाकीवरील दोघांच्या मृतदेहाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. यामुळे मृतांची ओळख पटण्यासाठी किमान दोन तासाचा अवधी लागला. अपघाताचे वृत्त समजताच तालुका पोलिस व सामाजिक कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शववाहिकेतून मृतदेह सामान्य रुग्णालयात हलविले. जखमी झालेल्या तरुणांला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे तरुण अख्तराबाद भागातील निकाह (विवाह) आटोपून महामार्गावर दुचाकीने फिरायला जात असताना ही दुर्घटना घडली. तालुका पोलिस ठाण्यात कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: मालेगावात कॉंग्रेसला धक्का, माजी आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर

loading image
go to top