नाशिक- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकच्या ईगतपुरीत तीन दिवसीय शिबिर आयोजित केले आहे. असे असताना त्यापाठोपाठ आता शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेदेखील जुलै महिन्यात नाशिकच्या मैदानात उतरणार आहे. दोन दिवसांच्या दौऱ्यात राजकीय व्यूहरचना आखली जाणार आहे.