UGC NET exam
UGC NET examesakal

नाशिक : UGC NET परीक्षा 8 जुलैपासून

Published on

नाशिक : युजीसी नेट परीक्षेच्‍या (UGC NET Exam) तारखांबाबतची घोषणा नॅशनल टेस्‍टींग एजन्‍सी (NTA) यांच्‍यातर्फे केली आहे. डिसेंबर २०२१ आणि जून २०२२ अशा दोन सत्रांची एकत्रितरीत्या परीक्षा घेतली जाणार आहे. ८ जुलैपासून परीक्षेला सुरुवात होणार आहे. दुसऱ्या टप्‍यात १२ ऑगस्‍टपासून देशभरातील केंद्रांवर युजीसी-नेट परीक्षा पार पडणार आहे. (UGC NET exam from July 8 Nashik Education News)

'एनटीए'तर्फे डिसेंबर २०२१ आणि जून २०२२ असे दोन सत्रांतील परीक्षा एकत्रितरीत्या घेण्याचे निश्‍चित करण्यात आलेले आहे. यापूर्वी युजीसी नेट परीक्षेच्‍या नोंदणीसाठी ३० एप्रिल ते २० मेदरम्‍यान मुदत दिलेली होती. मात्र उमेदवारांच्‍या वाढत्‍या मागणीमुळे नोंदणीच्‍या मुदतीत वाढ करण्यात आली होती. 'एनटीए'तर्फे जारी केलेल्‍या सूचनापत्रानुसार ८ ते १२ जुलैदरम्‍यान पहिल्‍या टप्प्‍यातील परीक्षा पार पडेल. तर १२ ते १४ ऑगस्‍ट या कालावधीत दुसऱ्या टप्प्‍यातील परीक्षा पार पडणार आहे.

UGC NET exam
Nashik : पॅरोलवरील ‘नॉट रिचेबल’ कैद्यांविरोधात गुन्हे

सविस्‍तर वेळापत्रक लवकरच

सध्या परीक्षांच्‍या तारखांची घोषणा केलेली आहे. युजीसी-नेट परीक्षा ऑनलाइन पद्धतीने (सीबीटी) घेतली जात असल्‍याने विविध सत्रांमध्ये परीक्षांचे आयोजन केले जाणार आहे. अशात विषयनिहाय सत्रांचा सविस्‍तर तपशील लवकरच उपलब्‍ध करून दिला जाणार असल्‍याचे एनटीएतर्फे स्‍पष्ट करण्यात आले आहे. तसेच उमेदवारांना त्‍यांच्‍या लॉगइनद्वारे लवकरच प्रवेशपत्र प्राप्त करून घेता येणार आहेत.

UGC NET exam
Nashik : बंडखोर आमदारांच्या निवास, कार्यालयांबाहेर पोलीस बंदोबस्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com