Nashik : ‘उज्ज्वला‘ गॅस सिलेंडर ‘रिफिलिंग'चे प्रमाण 20 टक्क्यांपर्यंत

gas cylinders
gas cylindersesakal

नाशिक : महागाईचा (Inflation) भस्मासुर बळावला असताना केंद्रापाठोपाठ राज्य सरकारने इंधनाचे भाव कमी (to reduce fuel prices) होण्यासाठी करात सवलत दिली. केंद्र सरकारने आर्थिक दुर्बल घटकातील गृहिणींसाठी राबवण्यात येत असलेल्या उज्ज्वला योजनेतंर्गत (Ujjwala Yojna) सिलिंडरमागे २०० रुपयांचे अनुदान देण्याचे धोरण स्वीकारले आहे. केंद्राच्या धोरणानंतर शहर आणि जिल्ह्यातील योजनेतंर्गत सिलिंडर पुन्हा भरून घेण्याचे प्रमाण किती आहे याची माहिती घेण्यात आली. त्यावेळी ‘रिफिलिंग'चे प्रमाण २० टक्क्यांपर्यंत असल्याचे चित्र पुढे आले आहे. (Ujjwala gas cylinder refilling rate up to 20 percent Nashik News)

शहर आणि जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबांनी २ लाख ९४ हजार गॅस सिलिंडरची उज्ज्वला योजनेतंर्गत नोंदणी केली आहे. गेल्या महिन्यात ५७ हजार ३४० सिलिंडर योजनेतंर्गत पुन्हा भरून घेण्यात आले आहेत. गॅस सिलिंडरच्या वाढलेल्या भावामुळे गरीब कुटुंबांना सिलिंडर पुन्हा भरून घेता येत नसल्याने गृहिणी पुन्हा लाकूडफाट्याकडे इंधनासाठी वळाल्या आहेत, असे चित्र सर्वदूर पाह्यला मिळत आहे. ही विदारक स्थिती सिलेंडरच्या पुन्हा भरण्यास मिळणाऱ्या प्रतिसादावरून अधोरेखित होते.

विशेषतः आदिवासी भागातील कुटुंबांना शेगडी पेटवण्यासाठी गॅस आणणे मुश्‍कील बनले आहे. उज्ज्वला योजनेतंर्गत वर्षाला १२ सिलिंडरसाठी हे अनुदान मिळणार आहे. त्यासाठी पती-पत्नीचे वार्षिक उत्पन्न दहा लाख रुपये ग्राह्य धरण्यात आले आहे. पण योजनेतंर्गत सिलिंडर भरून घ्यायचे झाले, तरीही दुकानदारांना पूर्ण किंमत द्यावे लागते. मग लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा होते. त्यामुळे एवढी मोठी रक्कम दरमहा कोठून आणायची? असा गंभीर प्रश्‍न सध्यस्थितीत गरीब कुटुंबांपुढे उभा ठाकला आहे.

gas cylinders
Nashik : सिडकोतील अनाधिकृत घरे निष्काशित

दरम्यान, गेल्यावर्षी घरगुती गॅस सिलिंडर ८१३ रुपयांना मिळत होते. ७ मे २०२२ ला झालेल्या दरवाढीनुसार आता ग्राहकांना १ हजार ६ रुपये ५० पैसे एका सिलिंडरला द्यावे लागत आहेत. गेल्यावर्षीच्या दराची तुलनात्मक परिस्थिती लक्षात घेता, वर्षभरात भाववाढीने शहर आणि जिल्ह्यातील ग्राहकांना ४२० कोटींचा भुर्दंड बसल्याचे दिसून येत आहे. व्यावसायिक सिलिंडरसाठी २ हजार ४३० सिलिंडरची नोंदणी करण्यात आली आहे. १ मेपासून व्यावसायिक सिलिंडरच्या भावामध्ये १०२ रुपयांनी वाढ झाली आहे. आता व्यावसायिक सिलिंडरसाठी २ हजार ३७४ रुपये मोजावे लागतात. व्यवसाय, उद्योगांच्या व्याप्तीच्या स्वरूपात महागाईच्या बसणाऱ्या झळा निरनिराळ्या आहेत.

gas cylinders
नाशिक : माध्यान्‍ह भोजन ठेक्‍याची प्रक्रिया पुन्‍हा सुरु

गॅस सिलिंडरची नोंदणी

० घरगुती गॅस सिलिंडर : १८ लाख ५ हजार

० व्यावसायिक सिलिंडर : २ हजार ४३०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com