युकेस्थित हॉटेल ब्रॅंन्‍ड स्‍विस ट्रॅफलार नाशिकमध्ये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

UK

युकेस्थित हॉटेल ब्रॅंन्‍ड स्‍विस ट्रॅफलार नाशिकमध्ये

नाशिक : स्विस ट्रॅफलगार लक्झरी हॉटेल्स (Luxury hotels Swiss Trafalgar) या युनायटेड किंगडम (UK) येथे मुख्यालय असलेल्या हॉटेल्सची साखळी भारतात दाखल झाली आहे. समूहातर्फे देशातील पहिले हॉटेल नाशिकमध्ये सुरु केले आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर पाथर्डी फाटा परीसरात हे हॉटेल लवकरच ग्राहक सेवेसाठी खुले होणार आहे. हॉटेलसाठी पहिल्या टप्प्यात पंधरा कोटींची गुंतवणूक झालेली असून, आणखी दोन मजली बांधकाम करत हॉटेलचा विस्‍तार केला जाईल. (UK based Hotel Brand Swiss Traffler soon opened in Nashik Nashik News)

हॉटेलचे महाव्यवस्थापक अश्विन भारद्वाज यांनी माहिती दिली. ते म्‍हणाले, की स्विस ट्रॅफलगारमध्ये अलिशान खोल्या, बँक्वेट, क्लब आणि कॅफेद्वारे जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्‍ध होतील. हॉटेलमधील कर्मचारी अनुभवी, प्रशिक्षित आहेत. सुरुवातीच्या प्रतिसादाच्या आधारे हॉटेलमध्ये वाढ करण्याची आणि आणखी शंभराहून अधिक खोल्या वाढविण्याची अतिरिक्त क्षमता आहे.

स्विस ट्रॅफलगारमध्ये बारा एकर ग्रीन लॉनचा समावेश असून येथे कोणत्याही कौटुंबिक कार्यक्रमासाठी किंवा कॉर्पोरेट कार्यक्रम घेतले जातील. स्विस ट्रॅफलगारने नाशिककरांसाठी कॅफेदेखील खुला केला असून, प्रशिक्षित आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित हॉस्पिटॅलिटी संस्थांमधून शेफ्सची नियुक्ती केली आहे. कॅफेमध्ये आशियाई, युरोपियन, दक्षिण आणि उत्तर भारतीय पारंपारिक विविध प्रकारचे पदार्थ उपलब्ध असतील. हॉटेलचे कार्यकारी संचालक दिगेश सिंग, प्रोस इंटिग्रेटेडचे संस्‍थापक व सीईओ सेतू शहा यांनी विस्‍तार धोरणाबाबत माहिती दिली.

हेही वाचा: Nashik : सिपेट जागेवरून आमदार भुजबळ-खासदार गोडसे आमने सामने

महिलांसाठी स्‍वतंत्र व्‍यवस्‍था

नाशिकमधील पहिलाच संकल्‍पनेवर आधारित क्लबदेखील सुरु होणार असून शुभारंभानिमित्त विविध योजना जाहीर केल्‍या जातील. स्विस ट्रॅफलगारमध्ये महिला प्रवाशांसाठी समर्पित असलेला विभाग असेल. या विभागात केवळ महिला कर्मचाऱ्यांकडूनच सेवा दिली जाईल. पुरुषांचा वावर राहणार नाही.

हेही वाचा: नाशिक : निधीखर्चाचे राजकारण विकासाच्या मुळावर

Web Title: Uk Based Hotel Brand Swiss Traffler Soon Opened In Nashik Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NashikBranding