निफाड - दरवर्षी गोदाकाठाला पाणवेलींचा विळखा पडत असून, जनतेने वारंवार तक्रारी करूनही प्रशासन त्याबाबत कार्यवाही करीत नाही. या पाणवेलींमुळे आरोग्यासह अनेक गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळे आता प्रशासनाच्या उदासीन भूमिकेविरोधात गोदाकाठच्या सरपंचांनी आक्रमक भूमिका घेत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत प्रशासनाला अल्टिमेटम दिला आहे.