पळसन आनंदाचा शिधावाटप

पळसन आनंदाचा शिधावाटप
Published on: 
PLS26B01968 उंबरठाण ः येथे अतिदुर्गम भागात ५०१ दुष्काळग्रस्त नागरिकांना ''आनंदाचा शिधा'' किटचे वाटप करताना तालुकाध्यक्ष हरिभाऊ भोये. सोबत विश्रांती गायकवाड. -------------- दुर्गम भागातील पाचशेवर नागरिकांना आनंदाचा शिधा ------------- शिवसेनेच्या उपक्रमामुळे पाड्यावर दिवाळी गोड ------------- सकाळ वृत्तसेवा पळसण, ता.१४ ः महाराष्ट्र- गुजरात सीमेवरील दुर्गम मानल्या जाणाऱ्या उंबरठाण परिसरातील ५०१ गोरगरीब आदिवासी, गरजू आणि दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असलेल्या ''आनंदाचा शिधा'' किटचे वाटप करण्यात आले. शिवसेना (शिंदे गट) पक्षातर्फे हा उपक्रम झाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या उंबरठाण येथील ५०१ आदिवासी व दुष्काळग्रस्त कुटुंबांना साखर, रवा, तूरडाळ, तांदूळ, खाद्यतेल आणि साबण या जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. ​तालुकाप्रमुख हरिभाऊ भोये यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम झाला. सीमेवरील अतिदुर्गम भागातील आदिवासी व गरजू नागरिकांना या मदतीमुळे मोठा दिलासा मिळाल्याचे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी यावेळी नमूद केले. महिला तालुकाप्रमुख विश्रांती गायकवाड, युवासेना प्रमुख हेमराज जाधव, लकी निपुंगळे, माधव महाले, उपतालुकाप्रमुख जगन चौधरी, गटप्रमुख जगन देशमुख, गणप्रमुख जिवा सहारे यांच्यासह गटप्रमुख अरुण सहारे, काशिराम गावित, मनोहर भोये, रमेश वाघमारे, नरेश कणसे, प्रभाकर चौधरी, मनोज महाले, चंद्रकांत मुंडा, अशोक कणसे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच परिसरातील दुष्काळग्रस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेनेच्या माध्यमातून सुरगाणा तालुक्यात सुरू करण्यात आलेले सोनोग्राफी सेंटर, रुग्णांसाठी उपलब्ध करून दिलेली रुग्णवाहिका आणि सुरगाणा शहराचा सर्वांगिण विकास यासारख्या महत्त्वाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यात आल्याचे सांगण्यात आले. भविष्यातही दुर्गम भागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. -----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.