पान दोन
-----------------------------
14958
नाशिक : ना फेरीवाला क्षेत्र फलकाच्या खाली अनधिकृरित्या केलेले अतिक्रमण.
ना फेरीवाला क्षेत्र फलकाखाली
अतिक्रमण; महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
सकाळ वृत्तसेवा
जुने नाशिक, ता.६: ना फेरीवाला क्षेत्र फलकाच्या खालीच मोठ्या प्रमाणावर अनधिकृत अतिक्रमण करून व्यवसाय सुरू आहे. शहरातील मेन रोड परिसरातील घाडगे महाराज पुतळा परिसरात अशा प्रकारचे चित्र दिसून येत आहे.
अतिक्रमण पथकाकडून ठराविक ठिकाणचे अतिक्रमण काढून कारवाईचा गाजावाजा केला जातो. मेन रोड गाडगे महाराज चौकात चक्क ना फेरीवाला क्षेत्र लावण्यात आलेल्या फलकाखालीच काही व्यावसायिकांकडून अनधिकृतरीत्या व्यवसाय केला जात आहे. असे असताना महापालिका अतिक्रमण पथकाकडून त्याकडे का दुर्लक्ष होत आहे. असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहे. त्या दुकानांवर मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची गर्दी होत असल्याने वाहतुकीसही अडचण निर्माण होत असते. मेन रोड येथून साक्षी गणेश मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर याच भागातून वळण घेतले जाते. अशा वळणावरच अनधिकृत व्यवसाय ठरला असल्याने नागरिकांसह वाहन चालकांनाही वाहतूक कोंडीस सामोरे जावे लागते.
दैनंदिन अतिक्रमण निर्मूलन कारवाई केल्याचा आव आणला जातो. प्रत्यक्षात, मात्र अतिक्रमण निर्मूलन पथकास येथील ना फेरीवाला क्षेत्राखालील अनधिकृत व्यवसाय कसे दिसून येत नाही. असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे अतिक्रमण पथकाने संबंधित क्षेत्र अतिक्रमण मुक्त करण्यात यावा. अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहे.