गोदावरीतील अनधिकृत धोबीघाट उद्‌ध्वस्त; आयुक्तांच्या दौऱ्यानंतर दणका

Unauthorized Plottings demolished by NMC workers
Unauthorized Plottings demolished by NMC workersesakal

नाशिक : महापालिका आयुक्त रमेश पवार (NMC Commissioner Ramesh Pawar) यांच्या गोदावरी पाहणीनंतर गुरुवारी (ता. २) सक्रिय झालेल्या महापालिका (NMC) यंत्रणेने गोदावरी नदीत अनधिकृतपणे बांधलेला धोबीघाट उद्ध्वस्त करून सदर व्यावसायिकांवर १० हजार रुपये दंडाची कारवाई केली. गोदावरी नदीचे प्रदूषण (Pollution) टाळण्यासाठी विविध उपाययोजना करण्याच्या दृष्टीने आयुक्त रमेश पवार यांनी बुधवारी (ता १) अहिल्याबाई होळकर पूल ते जलालपूर मनपा हद्दीपर्यंत नदीची पाहणी केली होती. या वेळी आयुक्तांनी गोदावरीत मिसळणाऱ्या सुमारे ५० नाल्यांबाबत कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. (Unauthorized Dhobighat in Godavari demolished After visit of NMC Commissioner Nashik News)

Unauthorized Plottings demolished by NMC workers
बँक ऑफ महाराष्ट्र कर्जवाढीमध्ये सार्वजनिक बँक क्षेत्रात अव्वल!

पाहणीत चोपडा लॉन्स येथील पुलाच्या बाजूला खासगी व्यावसायिकाने गोदावरीत धोबीघाट उभारून कपडे धुताना निदर्शनास आले होते. त्या ठिकाणी व्यावसायिकाकडून गोदावरी नदीचे प्रदूषण होत असल्याने दगडी पक्क्या स्वरूपात असलेला धोबीघाट त्वरित तोडून संबंधित व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार गुरुवारी पश्चिम विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र व त्यांच्या पथकाने संबंधित व्यावसायिकाने गोदावरी नदीत अनधिकृतपणे बांधलेला धोबीघाट उद्‌ध्वस्त करून व्यावसायिकांवर १० हजार रुपये दंडाची कारवाई केली.

Unauthorized Plottings demolished by NMC workers
शालेय साहित्य खरेदीची तयारी : किंमती 20 ते 30 टक्क्यांनी वाढल्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com