NSK26H31401
जळगाव : रोटरी सेंट्रलतर्फे आयोजित कार्यक्रमात गीत सादर करताना कलावंत.
––
दिव्यांग कलावंतांचा ताल, युवा गायकांचा सूर
(उपशीर्षक)
रसिकांनी अनुभवली जळगाव रोटरी सेंट्रलची अनोखी मैफील
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ५ : रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलच्या वतीने पाच दिव्यांग व्यक्तींच्या विवाह कार्यानिमित्त निधी संकलनासाठी मुंबईतील दिव्यांग (दृष्टिहीन) वादक आणि युवा गायकांच्या ‘दिल चाहता है; या अनोख्या मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. यात रसिकांना अनोखी मैफील अनुभवयास मिळाली.
छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात झालेल्या मैफिलीच्या शुभारंभप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील, कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी, जैन इरिगेशन सिस्टिम लिमिटेडचे चेअरमन अशोक जैन, खासदार स्मिता वाघ, आमदार राजूमामा भोळे, महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, नयनतारा बाफना, सहप्रांतपाल डॉ. पंकज शाह, प्रेसिडेंट एन्क्लेव्ह दिलीप गांधी, रोटरी सेंट्रलचे माजी अध्यक्ष व माजी महापौर विष्णू भंगाळे व माध्यम सल्लागार विजय डोहोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी रोटरी सेंट्रलचे अध्यक्ष ॲड. केतन ढाके यांनी प्रास्ताविक तर प्रोजेक्ट चेअरमन कल्पेश दोशी यांनी दृष्टिहीन कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून मनोरंजनासोबत सामाजिक संवेदना आणि सेवाभाव जपणारा हा उपक्रम असल्याची भावना व्यक्त केली.
भीमसिंह कौटियाल यांनी निवेदन केले. तृप्ती बाकरे यांनी सूत्रसंचालन तर मानद सचिव दीपक नाथानी यांनी आभार मानले. कार्यक्रमास जैन इरिगेशन, सिद्धार्थ बाफना, प्रेम कोगटा, सतीश मित्तल, सुनील बाफना, विपुल पारेख, माजी महापौर नितीन लढ्ढा, व्यावसायिक सुनील झंवर यांचे सहकार्य लाभले.
चौकट
युवा गायकांचा सहभाग
१६ ते २० वर्षे वयोगटातील अमोल चव्हाण, मिथिला, उत्कर्ष चंदनशिवे व निर्जला वाल्मिकी या युवा गायकांनी सुमधुर स्वरात विविध गाणी सादर केली. त्यांना विविध वाद्यांवर दृष्टिहीन कलावंत सुनील पाटील, अशोक, ॲगस्टिन, सुशांत आणि रितेश यांनी सुरेख साथ संगत केली.