Unique Wedding: लग्नातील अनोख्या आहेराने घडविले कृषिसंस्कृतीचे दर्शन! शेतकरी मोगल यांच्या उपक्रमाचे कौतुक

During the wedding ceremony, gifts were received in the form of dowry. Shamrao Moghal from left and bride Rituja and groom Prasad from right are seen.
During the wedding ceremony, gifts were received in the form of dowry. Shamrao Moghal from left and bride Rituja and groom Prasad from right are seen.esakal

Unique Wedding : विवाह हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा संस्कार आहे.मात्र अलीकडच्या काळात हा संस्कार न राहता मानपान आणि प्रतिष्ठेसाठी एक इव्हेंट झाल्याचे सर्वत्र पाहायला मिळते.

अनेक ठिकाणी वारेमाफ खर्च करून मोठेमोठे लग्नसोहळे होतात.तर अनेकजण लग्नांमध्ये वधू-वरांना भेट देण्यासाठी महागड्या वस्तू,सोने-नाणे देतात. असे असताना मौजे सुकेणे (ता.निफाड) येथील शेतकरी शामराव मोगल यांनी एक अनोखा आहेर कन्यादानप्रित्यर्थ आपल्या मित्राच्या मुलीच्या लग्नात दिला आहे.

खर्चिक गोष्टींना फाटा देत त्यांनी कृषी संस्कृतीचे दर्शन घडविले आहे. (unique surprise of wedding made vision of agricultural culture Appreciation of initiative of Shetkari Mogal nashik news)

esakal

शामराव मोगल यांचा जिवाभावाचा असलेला मित्र शाम काठे यांची कन्या ऋतुजा व प्रसाद यांचा लग्नसोहळा नुकताच नाशिक येथे पार पडला.मात्र लग्नात बडेजाव न करता एक आदर्श त्यांनी घालून दिला. एकीकडे महागड्या गाड्या, मोटरसायकली तर घरातल्या वस्तू या भेट स्वरूपात देण्याची पद्धत पडत आहे.

मात्र शामराव यांनी या सर्व गोष्टींना फाटा देत अनोखी भेट वधूला दिली आहे.ज्यामध्ये देशी गाय, विषमुक्त अन्न-धान्यासह ११ प्रकारचा भाजीपाला, ५ किलो गूळ, देशी गाईचे तूप,२१ किलो. गहू, ज्वारी व बाजरी तर ५ किलो नागली,

पिवळी व लाल जास्वंद, चाफा, प्राजक्त अशी फुलझाडे, तुळस यासह ३१ प्रकारची विविध देशी झाडे, दगडी जाते, रांजण आदीची भेट देण्यात आली. तर लक्ष्मीचे प्रतिक म्हणून मातीची चूल दिली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

esakal
During the wedding ceremony, gifts were received in the form of dowry. Shamrao Moghal from left and bride Rituja and groom Prasad from right are seen.
MPSC Success Story: कळवणच्या कल्पेशने घातली सहाय्यक नगर रचनाकार पदाला गवसणी!

लग्न मांडवात हा आहेर ठेवण्यासाठी त्यांनी ज्वारी व बाजरीच्या कडब्याचा वापर करून आकर्षक एक दालन बनविले होते.त्यामध्ये आहेराच्या वस्तूंची मांडणी केली होती.हा आहेर पाहण्यासाठी लग्नानिमित्त उपस्थित असलेले सह्याद्री फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्षव व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे,

आमदार सीमा हिरे, माजी आमदार अनिल कदम, माणिकराव बोरस्ते, आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत, शिवछञपती क्रीडा पुरस्कार विजेते डॉ. सुनील मोरे यांनी भेट देत या उपक्रमाचे कौतुक केले.

मोगल हे सध्या १९ एकर क्षेत्रावर सेंद्रीय पध्दतीने शेती करत आहेत.यापूर्वी मोगल यांनी त्यांच्या भाचीच्या लग्नातही अशाच प्रकारे विषमुक्त शेतीची साधने दिली होती.

महापुरूषांचे चरित्र ग्रंथही...

सेंद्रिय कृषि उत्पादनासोबत ग्रंथ ज्यामध्ये श्रीमद भगवत गीता, ज्ञानेश्वरी, भागवत चरित्र देण्यात आले. नवीन पिढीच्या.प्रेरणा व चारित्र्य निर्मितीसाठी छत्रपती शिवाजी महाराज,स्वामी विवेकानंद,लोकमान्य टिळक आदींचे चरित्र ग्रंथ भेट देण्यात आले.

"पूर्वी आपले आजी-आजोबांच्या काळात अशा गोष्टींचा वापर होता. त्यामुळे निरोगी आयुष्य व आनंदी जीवन पूर्वीची पिढी शेतीमातीच्या सानिध्यात जगली. हाच आदर्श व हीच जीवनशैली पुन्हा रुजावी. आपल्या संस्कृतीला गतवैभव असेच मिळावे, यसाठी हा छोटा प्रयत्न होता.लग्नात वारेमाप खर्च न करता आनंद घेण्यात यावा.त्यातून शेतकरी पैशांची उधळपट्टी करून कर्जबाजारीपणा थांबेल,असे मला वाटते." - शामराव मोगल

During the wedding ceremony, gifts were received in the form of dowry. Shamrao Moghal from left and bride Rituja and groom Prasad from right are seen.
Success Story: वयाच्या 32 व्या वर्षी 10 खासगी जेटची मालकीन, कोट्यवधींची संपत्ती; कोण आहे कनिका टेकरीवाल?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com