शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी पणनचा पुढाकार

शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी पणनचा पुढाकार
Published on: 
लोगो : सकाळ विशेष विनापरवाना व्यापाऱ्यांना बसणार चाप! पणन संचालकांचे कठोर निर्देश; कांदा उत्पादकांसह शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण होणार सकाळ वृत्तसेवा नामपूर, ता. १५ : कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कार्यक्षेत्राबाहेर विनापरवाना शेतीमाल खरेदी-विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर आता कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. राज्याच्या पणन संचालकांनी याबाबत कठोर निर्देश दिले असून, संबंधित यंत्रणांना कायद्यानुसार कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत. या निर्णयाचे शेतकरी संघटनेने स्वागत केले असून, अनधिकृत व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. जिल्ह्यात विशेषतः कांद्याच्या बाजारपेठेत नियमांचे उल्लंघन करून खरेदी-विक्री होत असल्याच्या तक्रारी आहेत. अशा व्यवहारांमुळे शेतकऱ्यांचे पैसे थकण्याचा आणि आर्थिक नुकसान होण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे संबंधित बाजार समित्या आणि जिल्हा उपनिबंधकांना अनधिकृत व्यवहारांवर लक्ष ठेवून कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शेतीमालाची खरेदी-विक्री नियममुक्त असली, तरी आवश्यक परवाना किंवा अनुज्ञप्तीचे नियम पाळणे बंधनकारक आहे. व्यापाऱ्यांनी मालाचे नाव, वजन, बाजारभाव, आकार आणि देय रकमेची नोंद ठेवून शेतकऱ्यांना अधिकृत पावती देणेही आवश्यक आहे.आता या आदेशांची अंमलबजावणी कितपत प्रभावी होते, याकडे बाजारपेठेचे लक्ष लागले आहे. कोट पणन विभागाच्या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी झाल्यास अनधिकृत व्यापाऱ्यांना आळा बसेल आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताचे संरक्षण होईल. - अभिमन पगार, उत्तर महाराष्ट्र प्रमुख, कांदा उत्पादक शेतकरी संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com