लॅपटॉपने वाहनाचे लॉक उघडणाऱ्या Fortuner चोरट्यांपैकी एकाला राजस्थानातून अटक | Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fortuner car thief caught at rajasthan

लॅपटॉपने वाहनाचे लॉक उघडणाऱ्या Fortuner चोरट्यांपैकी एकाला राजस्थानातून अटक

नाशिक : पळसे येथून चोरून (Stolen) नेलेली ३५ लाखांची फॉर्च्युनर कार (Fortuner Car) राजस्थानात सापडली असून, याप्रकरणी नाशिक रोड पोलिसांनी एकाला अटक केली.

तर, सदरील इलेक्ट्रिक वाहनाचे (EV) लॉक लॅपटॉपच्या साहाय्याने उघडून चोरी करणाऱ्या दोघांचा पोलिस राजस्थानात शोध घेत आहेत. पांडुरंग एखंडे (रा. पळसे, नाशिक) यांची कार ८ जुलैच्या मध्यरात्री चोरट्यांनी चोरून नेली होते. (unlocking vehicle with laptop Fortuner thief arrested from Rajasthan Nashik crime Latest Marathi News)

गुन्ह्याचा तपास करताना नाशिक रोड गुन्हे शोध पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. सदरील वाहन धुळेमार्गे मध्य प्रदेश, राजस्थानकडे गेल्याची शक्यता गृहित धरून राजस्थान, मध्य प्रदेश पोलिसांना माहिती दिली.

त्यानुसार, राजस्थानातील चित्तोडगड येथील भंडारिया पुलाजवळील नाकाबंदीमध्ये सदर कार राजस्थान पोलिसांनी पकडले. त्याची माहिती नाशिक रोड पोलिसांना दिली. संशयित व वाहनाला घेण्यासाठी सहाय्यक निरीक्षक योगेश पाटील, अनिल शिंदे, मनोहर शिंदे, अविनाश देवरे, राकेश बोडके, केतन कोकाटे यांचे पथक राजस्थानकडे रवाना झाले.

पोलिसांनी संशयित सावलाराम बाबूलाल बिश्‍नोई (२३, रा. राजस्थान) यास अटक करून कार जप्त केली. दरम्यान, चौकशीत त्याने आणखी दोघांच्या मदतीने सदरील इलेक्ट्रिक वाहन चोरी केल्याचे सांगितले. संशयित मुकेश खिलेरी, सुरेश खिलेरी (रा. राजस्थान) यांनी लॅपटॉप वायफायने सुरू करून कारचे लॉक उघडून चोरी केल्याचे चौकशीतून समोर आले.

या दोघा संशयितांना अटक करण्यासाठी नाशिक रोड पोलिसांचे एक पथक राजस्थानकडे रवाना झाले आहे. सदरची कामगिरी आयुक्त जयंत नाईकनवरे, उपायुक्त विजय खरात, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गणेश न्यायदे, राजू पाचोरकर, सहायक निरीक्षक योगेश पाटील यांच्या पथकाने बजावली.

हेही वाचा: OBCचे राजकीय आरक्षण पूर्ववत; NCP भवनाबाहेर जल्लोष, पाहा PHOTOS

Web Title: Unlocking Vehicle With Laptop Fortuner Thief Arrested From Rajasthan Nashik Crime Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top