Unseasonal Rain : कुठे गारांचा खच, तरकुठे टोमॅटो भुईसपाट! इगतपुरी तालुक्यात पिकांना फटका

Tomato crop damaged by unseasonal rain and hail.
Tomato crop damaged by unseasonal rain and hail.esakal

खेडभैरव (जि. नाशिक) : इगतपुरी तालुक्यात काही दिवसांपासून अवकाळी पावसासह गारपीट होत असल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

याचा सर्वाधिक फटका बागायती भाजीपाला पिकांना व रब्बी पिकांना बसत आहे. लाखो रुपये खर्च करून उभ्या केलेल्या पिकांवर अवकाळी पाऊस व गारा कोसळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. (Unseasonal Rain heavy rain crop damage hit in Igatpuri taluka nashik news)

इगतपुरी तालुक्यात विशेषत: पूर्व भागात रब्बी हंगामात दर वर्षी टोमॅटोचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. प्रामुख्याने दौंडत, उभाडे, धामणी, पिंपळगाव मोर, बेलगाव तऱ्हाळे, धामणगाव, साकूर, टाकेद, अधरवड, खेड आदी परिसरात शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली.

मात्र, लाखो रुपये खर्च करूनही अवकाळीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. बिगरमोसमी पावसामुळे शेतीवर बुरशीजन्य, करपा, घुबडा आदी रोगांचा प्रादुर्भाव दिसत आहे. सलग तीन दिवस रात्रीच्या वेळी पाऊस झाल्याने टोमॅटोचे नुकसान झाले आहे.

गारपिटीने टोमॅटो फळांना तडे जाऊन फळगळ झाली आहे. कुठे गारांचा खच, तर कुठे तारी-बांबूसहित पीक जमिनीवर लोळले आहे. टोमॅटो लागवड, महागडी औषधे, खते यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च केले आहेत.

हेही वाचा : अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

Tomato crop damaged by unseasonal rain and hail.
Unseasonal Rain : द्राक्षबागांमध्ये घड, मणी, पानांचा सडा; शेतकरी हवालदिल

मात्र, वाढत्या थंडीमुळे पिकांवर होत असलेल्या प्रतिकूल परिणामांमुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी चिंतातूर झाला आहे. भुईमूग, वांगे, मका, ज्वारी आदींसह वेलवर्गीय पिकांवरही बिगरमोसमीचा परिणाम जाणवत आहे. शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

"काही दिवसांपासून अवकाळीने शेतीचे नुकसान होत आहे. शेतीसाठी खर्च केलेले भांडवलही निघत नसल्याने शेती करायची कशी, असा प्रश्‍न आहे. टॉमॅटो पीक उभे करण्यासाठी हजारो रुपये खर्च केले. मात्र, अवकाळी पाऊस व गारांमुळे टॉमेटो पीक भुईसपाट होत आहे. शासनाने नुकसानभरपाई द्यावी." -उत्तम काळे, शेतकरी, पिंपळगाव मोर

Tomato crop damaged by unseasonal rain and hail.
Unseasonal Rain : कातरणी, आडगाव रेपाळ परिसरात पिके उध्वस्त; गारांच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com