Unseasonal Rain : एकाच पावसात वीज व्यवस्था कोलमडली; खांब उन्मळले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

unseasonal rain and gusty winds and lightning uprooted electricity poles in many areas nashik news

Unseasonal Rain : एकाच पावसात वीज व्यवस्था कोलमडली; खांब उन्मळले

नाशिक : पहाटेपासून सुरू असलेल्या पावसाने (unseasonal rain) वीज (Electricity) गायब होण्याचे प्रकार वाढले.

रविवार (ता. ५) रात्रीपासून पहाटेच्या चोवीस तासास शहरात ९ मि. मी पावसाची नोंद झाली. (unseasonal rain and gusty winds and lightning uprooted electricity poles in many areas nashik news)

दरम्यान, सोसाट्याच्या वारा विजेच्या कडकडाटासह सुरू झालेल्या पावसाने अनेक भागात वीजेचे खांब उन्मळले. परिणामी, सोमवारी (ता. ६) दिवसभर वीजपुरवठा वारंवार खंडित होत होता. वीज वितरण कंपनीच्या जनमित्रांची दिवसभर ठिकठिकाणी वीज प्रवाह पुर्ववत करण्यासाठी धावाधाव सुरू होती.

मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रात रविवारपासून गडगडाटासह तुरळक ते मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरवात झाली. रविवारी जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यासह घाटमाथ्यावर तुरळक ते हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळल्या त्यानंतर रविवारच्या दिवसभराच्या विश्रांतीनंतर सोमवारी पहाटे दोनपासून शहरासह जिल्ह्यातील विविध भागात जोरदार मेघगर्जनेसह पाऊस सुरू झाला.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

रविवारी रात्री साडेआठ ते सोमवारी सकाळी साडेआठपर्यंतच्या चोवीस तासात सुमारे ९ मि.मी.पावसाची नोंद झाली. पावसाने पिकांना दणका दिलाच सोबत बेमोसमी पावसाने शहरातील वीज व्यवस्थेवर परिणाम झाला.

वीजेचे खांब उन्मळले. पहाटेपासून सुरू असलेल्या पावसाने नाशिक व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अनेक गावात वीजेचे खांब उन्मळून पडले. गाजरवाडी तसेच खंबाळे भागात वीजेचे खांब उन्मळून पडल्याने वीज व्यवस्था कोलमडली. शहरात अनेक ठिकाणी वीजेचे खांब वाकले. विजेच्या तारांवर फांद्या पडल्याने रात्रीपासून दिवसभर वीजपुरवठा वारंवार खंडित होत होता.

अनेक भागात वीज कंपनीने खबरदारीचा उपाय म्हणून वीज प्रवाह बंद केला होता. त्याचवेळी वीज गेलेल्या भागात सकाळपासून दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली. दीर्घकाळ कुठेही वीज बंद राहणार नाही. याची काळजी घेतली जात वीज वितरण कंपनीच्या सूत्रांनी सांगितले.