नाशिक- जिल्ह्यात एप्रिल व मे महिन्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांच्या भरपाईसाठी जिल्हा प्रशासनाने ४१ कोटी २९ लाख १९ हजारांच्या अनुदानाच्या प्रस्ताव शासनाला दिला होता, पण शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने २०२३ च्या निर्णयानुसार भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रशासनाने २२ कोटी नऊ लाख ९४ हजारांचा फेरप्रस्ताव सादर केला आहे. शासनाने ऐनवेळी बदललेल्या निर्णयामुळे फटका बसणार आहे.