नाशिक- अवकाळी पावसाने डोक्यावरचे छप्पर हरपलेल्या बाधितांना आता शासनाच्या लालफितीच्या कारभाराला सामोरे जावे लागत आहे. पडझडीच्या नुकसानभरपाईसाठी आधी पॅनकार्ड जमा करा, मगच अनुदान बँक खात्यात वर्ग होईल, असा तोंडी फतवाच जिल्हा प्रशासनाने काढला. त्यामुळे बाधितांची परवड होत आहे.