Monsoon
sakal
नाशिक: जिल्हावासीय गुढीपाडवा व नववर्ष स्वागताच्या आनंदात असताना गुरुवारी (ता. १९) जिल्ह्याच्या विविध भागांत गारपिटीसह अवकाळी पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे भाजीपाल्यासह कांदा, तसेच गव्हाला फटका बसला आहे. त्यामुळे शेतकरीराजा हवालदिल झाला. दरम्यान, शुक्रवारीही (ता. २०) ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांबरोबर नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.