
Unseasonal Rain : इगतपुरीसह तालुक्यात जोरदार गारांचा पाऊस; पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज
इगतपुरी शहर (जि. नाशिक) : इगतपुरी शहरासह तालुक्यात अवकाळी पावसाने रविवारी (ता. १९) दुपारच्या सुमारास अक्षरशः धुमाकूळ घातला. सोसाट्याच्या वारा अन् विजेचा कडकडाटासह जोरदार गारांचा पाऊस पडला. अनेक भागांमध्ये गारांचा पाऊस झाल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. (Unseasonal Rain Heavy hail rain in taluka including Igatpuri Estimates of crop damage nashik news)
हेही वाचा : अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....
पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. मात्र, हता-तोंडाशी आलेली रब्बी पिके, मका, गहू, हरबरा, भाजीपाला, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर आदींच्या लागवडीचे मोठे नुकसान झाले. तालुक्यात काही ठिकाणी शेडनेटदेखील उध्वस्त झाल्याने शेतकरी राजा हतबल झाला आहे. या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.