नाशिक- उन्हाळ्याच्या झळा वाढत असताना पुढील तीन दिवस नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने जारी केलेल्या अहवालानुसार नाशिकसह घाटमाथ्यावर, तसेच धुळे, जळगाव, नंदुरबारला विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. या संदर्भात येलो अलर्ट जारी केलेला आहे.