
Nashik Rain Update : अभोण्यात मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस; पिकांचे नुकसान
अभोणा (जि. नाशिक) : हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे येथील परिसरात रविवार (ता. ५) रात्री तीनच्या सुमारास विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह पावसाला सुरवात झाली. पहाटेपर्यंत वारा व जोरदार पावसाच्या सरींनी शेतात पाणी तुंबले. (Unseasonal rain with thunder in Abhona Damage to crops Nashik Rain Update news)
हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...
अवकाळी पावसामुळे कांदे, मिरची,टोमॅटो,गहू व हरभऱ्याचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पावसामुळे करपा, भुरी सारख्या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढणार असल्याने, शेतकऱ्यांना बुरशी नाशकांची फवारणीचा अतिरिक्त फटका बसला आहे.
परिसरातील बहुतांश आंब्याच्या झाडांना आलेला मोहर वारा आणि अवकाळी पावसाने झटकला असून, परिसरातील आंब्याचे प्रमाणही घटणार आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे.