नाशिक- शहरात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने तापमानापासून सुटका झाली असली तरी वीज, पाणीपुरवठा व इंटरनेट सेवा पूर्णपणे विस्कळित झाल्याने नाशिककर बेजार झाले आहेत. दर अर्ध्या तासाने वीजपुरवठा खंडित होत असल्याने कामकाजात अडथळे येत आहेत. शहरात पश्चिम, सिडकोतील पवननगर, सावतानगर व जुने नाशिक भागात पाणी न आल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली.