weather update
sakal
नाशिक: ढगाळ हवामानाचे रूपांतर आज बेमोसमी पावसात झाले. जिल्ह्यात येवला आणि नांदगाव तालुक्यात पावसाने त्रेधातिरपीट उडाली. अचानक टपोऱ्या थेंबासह झालेल्या पावसाने मंगळवारी (ता.२७) शेतकऱ्यांची धावपळ उडाली. येवला तालुक्यात पावसामुळे अनेक ठिकाणी उभा गहू आडवा झाला. कांद्यासह द्राक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. दुपारनंतर दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने नाशिकसह इतर द्राक्ष बागायतदारांच्या तोंडचे पाणी पळविले आहे.