Nashik Grapes News : दराअभावी द्राक्ष हंगामाचा गोडवा हरपला; 18 ते 25 रुपये किलो

अवकाळी पाऊसासह प्रतिकूल हवामानाशी झुंज देत निफाड व दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी द्राक्षबागा फुलविल्या. कर्ज काढून लाखो रुपये भांडवल द्राक्षबागेत गुंतविले.
Grapes
Grapesesakal

Nashik Grapes News : अवकाळी पाऊसासह प्रतिकूल हवामानाशी झुंज देत निफाड व दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी द्राक्षबागा फुलविल्या. कर्ज काढून लाखो रुपये भांडवल द्राक्षबागेत गुंतविले.

आकर्षक दर मिळून द्राक्षांच्या चवीप्रमाणे उत्पन्नाचा गोडवा मिळेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. (Unseasonal rains and now prolonged winter have affected grapes season nashik news)

मात्र, त्या स्वप्नाचा सध्या चक्काचूर होताना दिसत आहे. १८ ते २५ रुपये किलो, असा निच्चांकी दर हंगामाच्या प्रांरभीच द्राक्षाला मिळाल्याने उत्पादन खर्चही निघेल की नाही, या विवचंनेत शेतकरी आहेत. अवकाळी पाऊस व आता लांबलेली थंडीने द्राक्षहंगामाला प्रभावीत केले आहे. रसाळ, चवीला अविट गोड असलेल्या द्राक्ष हंगामाचा ‘श्रीगणेशा’ झाला आहे.

चार वर्षांपासून द्राक्ष उत्पादकांचे मागे असलेले समस्यांचे शुक्लकाष्ट यंदाही कायम राहिले. अवकाळी पावसाने द्राक्षबागा झोडपल्या. त्याची झळ आता दिसू लागली आहे. द्राक्ष घडांना तडे जाऊन दर्जा घसरला आहे. त्यातच थंडीचा कडाका दुष्काळात तेरावा महिना ठरत आहे. प्रतिकूल वातावरणामुळे द्राक्षाची गोडी, रंग येण्यास मोठा अडथळा निर्माण होत आहे.

Grapes
Nashik Grapes Export : द्राक्षपंढरीतून 20 हजार टनाने अधिकची निर्यात

निच्चांकी दर...

रशिया-युक्रेन युद्धामुळे द्राक्ष निर्यात संकटात सापडली आहे. त्या संघर्षाचा फटका द्राक्ष निर्यातीचा टक्का घसरला आहे. शिवाय बांग्लादेशला मोठ्या प्रमाणात जाणारे द्राक्ष भरमसाट आयात शुल्क दुष्काळात तेरावा महिना ठरत आहेत. बांग्लादेशला पुरवठा थांबला आहे. स्थानिक बाजारपेठांमध्ये थंडीच्या कडाक्यामुळे द्राक्षाला अपेक्षित मागणी नाही. त्यामुळे निच्चांकी दराने द्राक्ष हंगामाला सुरवात झाली आहे.

ऐरवी हंगामाच्या प्रारंभी द्राक्षाचे दर तेजीत असतात. यंदा मात्र दर घसरल्याने उलट स्थिती आहे. थाॅमसन, सोनाका वाणाच्या द्राक्षांना १८ ते २० रुपये दर मिळत आहे. काळ्या रंगाच्या वाणाला २५ रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे. कोविड काळात द्राक्षाच्या दराची वाताहत झाली होती. तीच परिस्थिती यंदा उद्‌भवली आहे. द्राक्षाचा सौदा करण्यासाठी शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांचा शोध घ्यावा लागत आहे.

Grapes
Nashik Grapes Export : द्राक्षपंढरीतून 20 हजार टनाने अधिकची निर्यात

नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत, दिंडोरी, उगाव, निफाड, वडनेर भैरव, चांदवड आदी भागांतून दररोज २०० ट्रकमधून ५०० टन द्राक्ष परराज्यात पोचत आहेत. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली येथे द्राक्ष पोचत असली, तरी थंडीमुळे अपेक्षित उठाव नाही. द्राक्षाला दर नसल्याने अर्थकारण थंड होऊन बाजारपेठेवर मोठा परिणाम होणार आहे.

''बांग्लादेशला द्राक्ष पाठविण्यासाठी वाढविलेला कर कमी करण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा. द्राक्षांच्या दरात सुधारणा झाली नाही, तर शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळणार आहे. सध्याया दरात उत्पादन खर्च फिटणार नाही.''-सुनील जाधव, द्राक्ष उत्पादक

''अवकाळी पावसामुळे द्राक्षांचा दर्जा घसरला आहे. त्यातच थंडीमुळे अपेक्षित मागणी नाही. युद्धाच्या स्थितीमुळे निर्यातीत घट होत आहे. द्राक्ष स्थानिक बाजारात येत असल्याने दरावर दबाव आले आहेत.''-संतोष निकम, रूचा फ्रूट, पिंपळगाव बसवंत

Grapes
Nashik Grapes Export : युरोपीय प्रांतात द्राक्ष उशिराने; द्राक्ष सौद्यात 20 टक्के झळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com