Agriculture News sakal
नाशिक
Agriculture News : अवकाळी पावसाने कांदा पीक भुईसपाट
वार्षिक अर्थकारण असलेल्या कांदा पिकावर नैसर्गिक आपत्तीमुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला.
कंधाणे- बागलाण तालुक्यातील पश्चिमेकडील भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने उन्हाळ कांदा काढणी लांबणीवर पडली असून, शेतात पाणी साचून चिखल झाल्याने परिपक्व झालेला कांदा जमिनीतच सडण्याची भीती आहे. वार्षिक अर्थकारण असलेल्या कांदा पिकावर नैसर्गिक आपत्तीमुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला.