नाशिक- जिल्ह्यात गुरुवारी (ता.३) सलग दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची धांदल उडविली. ‘कसमादे’ परिसरात गुरुवारीही मोठे नुकसान झाले. विशेषतः बागलाण, मालेगाव, चांदवडला काही ठिकाणी गारपीट झाली. .सिन्नरला तुरळक स्वरूपात पावसाने हजेरी लावली; तर बागलाण व निफाडला मुसळधार पाऊस झाला. बुधवारी (ता. २) बागलाण, कळवण, दिंडोरी तालुक्यातील ३० ते ३५ गावांना दणका दिला असताना गुरुवारी पुन्हा दुसऱ्या दिवशी पावसाने झोडपले..अंतापूर : बागलाण तालुक्यातील तुंगाडी ,मोसम करंजाडी खोऱ्यात सलग दुसऱ्या दिवशीही बेमोसमी वादळी पाऊस झाल्याने शेती पिकांसह असंख्य झाड व विजेचे खांब पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.दोन दिवसापासून जिल्ह्यासह तालुक्यात वादळी पावसामुळे काढलेला कांदा, टोमॅटो, मिरची, हरभरा, टरबूज, द्राक्ष ,डाळिंब इत्यादी पिकांचे नुकसान झाले. मुल्हेर आदिवासी पश्चिम भागासह ताहाराबाद, दसवेल पिंपळकोठे, सोमपूर, करंजाड निताने, मुंगसे, पिंगळवाडे परिसरात वादळी पावसाचा तडाखा गावठी बहार आलेल्या आंब्यांनाही बसल्याने असंख्य लहान-मोठे झाडे उन्मळून पडल्याने नुकसान झाले आहे..मुंगसे शिवारात वीजेचा खांब उन्मळून पडल्याने दोन दिवसापासून वीज पुरवठा खंडित झाला आहे. पिण्याच्या पाण्यासह इतर गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत. संबंधित विभागाने त्वरित उपाययोजना करून वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी सटाणा बाजार समितीचे माजी संचालक मनोहर निकम यांनी केली आहे..विठेवाडीत झाडावर वीज पडलीदेवळा शहर व तालुक्यात गुरुवारी (ता. ३) दुपारी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडाली. काढून ठेवलेला उन्हाळ कांदा, गहू, हरभरा भिजला; तर विठेवाडी (ता. देवळा) येथील भगवंत निकम यांच्या शेतातील लिंबाच्या झाडावर वीज कोसळली. घरापासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडल्याने सुदैवाने काही नुकसान झाले नाही. .देवळा शहरासह तालुक्यातील भावडबारी घाट, कापशी, भावडे, भिलवाड, विठेवाडी, सावकी तसेच खर्डे-वाजगाव दरम्यानच्या शिवारात मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. दुपारी चार वाजेच्या सुमारास अचानक मेघगर्जनेसह पावसाला सुरवात झाली. १५ ते २० मिनिटे सुरू असलेल्या अवकाळी पावसाने हजेरी लावली त्यामुळे काढणीला आलेल्या कांद्यासह गव्हाचे नुकसान झाले. कसमादे पट्ट्यात उन्हाळ कांदा काढणीची कामे चालू आहेत. दिवसभर ढगाळ व दमट वातावरण होते आणि दुपारी पावसाने हजेरी लावली. या दरम्यान काही वेळ वीजपुरवठा खंडित झाला..तळवाडे परिसरात कांदा हातातून जाणार?तळवाडे दिगर बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील गावांत सलग दुसऱ्या दिवशी विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. काही ठिकाणी बारीक गारादेखील पडल्या आहेत. अवकाळी व हवामानात झालेल्या बदलामुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे काढणीला आलेल्या गव्हासह भाजीपाला पिकाला फटका बसत आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात कांदा काढून शेतात आहे. त्यामुळे पावसाचे वातावरण झाले की कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडत आहे. बागलाण तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे पीक घेतले जाते, मात्र गेल्या पाच वर्षांपासून कांदा ऐन मोसमात असताना हवामानातील बदल व अवकाळी पावसामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडून कर्जबाजी होत आहेत. .तसेच कधी अस्मानी, तर कधी सुलतानी संकटांना तालुक्यातील शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. कांद्याचे आगर असलेल्या बागलाण तालुक्यात १०० टक्के कांदा काढणी सुरू असून, हातातोंडाशी आलेले पीक हातातून जाते की काय अशा भीतीने शेतकऱ्यांची झोप मात्र उडाली आहे..कसमादे परिसरात वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत जिल्हाधिकारी जलज शर्मा, बागलाण तालुका उपविभागीय प्रांताधिकारी कल्पना ठुबे, तसेच संबंधित विविध विभागांचे अधिकारी यांच्याशी संपर्क साधून तातडीने नुकसान भरपाईबाबत पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.- डॉ. शोभा बच्छाव, खासदार ,धुळे लोकसभा.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.