नाशिक- उत्तर महाराष्ट्रात विविध भागांना मंगळवारी (ता. ६) वादळी वाऱ्यासह गारपीट व पावसाने झोडपून काढले. अचानक आलेल्या पावसामुळे केळी, कांदा, मका, सोयाबीन, भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी राजाच्या डोळ्यांत अश्रू तरळले. दरम्यान, हवामान विभागाने नाशिक जिल्ह्याला बुधवारी (ता. ७) ऑरेंज अलर्ट दिला आहे. या वेळी घाटमाथा परिसरात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.