Monsoon Update : पहिल्याच पावसात दहीपुलावर 4 फुटांपर्यंत पाणी

Heavy rains
Heavy rains esakal

नाशिक : केंद्र सरकारच्या (Central government) बहुचर्चित स्मार्टसिटीच्या (Smart City) कामांविष्यी तक्रारी असताना बुधवारी पहिल्याच पावसात (Heavy Rain) दहीपुलावर चार फूट पाणी साचून वाहन चालल्याचे पाहायला मिळाले. स्मार्टसिटीच्या नावाने स्थानिकांना विश्वासात न घेता केबिनमध्ये बसून केलेल्या मनमानी कामाविषयी आक्रोश करीत नागरिकांनी तक्रारींचा पाऊस पाडला. दुपारनंतर आलेल्या धुवाधार पावसाने स्मार्टसिटीचे काम झालेल्या रस्त्यावर सुमारे चार फुटांपर्यंत पाणी साचले. (Up to 4 feet of water on Dahipula in first rain Nashik monsoon Update News)

दुपारी चारच्या सुमारास दहीपूल परिसरातील पाणी साचले होते, तर अर्ध्या तासातच पाणी चार फुटांपर्यंत जमा झाले. येथील अनेक दुकानांत पुन्हा पाणी शिरून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याच्या तक्रारी आहेत. रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्यादेखील पाण्यात बुडाल्या. येथील सार्वजनिक शौचालय असून, तेथील घाण पाणीदेखील संपूर्ण परिसरात पसरले. कोट्यवधी रुपये खर्च करून हा नवीन मार्ग तयार केला आहे.

Heavy rains
असुविधांमुळे विद्यार्थी खेळाडू होत नाही : अशोककुमार ध्यानचंद

मुख्य अधिकारी स्पॉटवर

दरम्यान, नागरिकांच्या आक्रोशानंतर स्मार्टसिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांनी दहीपुलावर पाहणी केली. महापालिका आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांच्याशी चर्चा केली. दहीपूल परिसरात पाणी साचणार नाही, याचे नियोजन केले जाईल, असे सांगितले.

Heavy rains
SMBT हॉस्पिटलमध्ये हृदयाच्या झडपांच्या 48 तासात 8 शस्त्रक्रिया

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com