उपनगर- वर्चस्ववादाच्या पार्श्वभूमीवर बेद आणि उज्जैनवाला टोळ्यांमध्ये झालेल्या संघर्षानंतर फर्नांडिसवाडी येथे मध्यरात्री गोळीबार झाला. या प्रकरणामुळे जय भवानी रोड परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, पोलिसांनी वेळीच कारवाई करीत आतापर्यंत एकूण आठ जणांना अटक केली आहे. संशयितांना न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात आली.