नाशिक: जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे उपविभागीय अधिकारी ओंकार पवार यांची नियुक्ती करण्यात आली. बुधवारी (ता. ६) सकाळी दहाला ते पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. माजी सीईओ आशिमा मित्तल यांची नुकतीच जालना जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली होती. त्यांच्या कार्यकाळानंतर प्रभारी जबाबदारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांच्याकडे सोपविण्यात आली होती.